Posts

औरंगाबाद शहरात १८ टक्के जनतेने पाहिले बजेट

औरंगाबाद : वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शहरातील केवळ १८ टक्के लोकांनी थेट प्रक्षेपण पाहिले असल्याची बाब ‘लोकमत’ने शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली. केंद्रातील भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प (२०१८-१९) असल्यामुळे गुरुवारी संपूर्ण देशाचे त्याकडे लक्ष लागले होते. ज्याविषयी सर्वच जण एवढ्या आतुरतेने बोलतात तो अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर होत असताना खरोखरच किती लोक त्याचे थेट प्रक्षेपण पाहत होते? ‘लोकमत’ने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यातून हे तथ्य समोर आले. इंधन, अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढून महागाईचा दर वर गेला की लोकांचा आक्रोश, नाराजी उफाळून येते. सरकारच्या धोरणावर, निर्णयावर टीकेची झोड उठते. सोशल मीडियावर चार गोष्टी सुनावल्या जातात. मग देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे धोरण ठरविणारा अर्थसंकल्प सादर होत असताना ही सर्वसामान्य जनता कशी पाहते याचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी शहरातील व्यापारी, उद्योजक, सीए, गुंतवणूकदार, बांधकाम व्यावसायिका, राजकीय कार

Budget 2018 : औरंगाबादच्या १,५०० लघु उद्योगांना मिळणार कॉर्पाेरेट कर सवलीतीचा लाभ

Image
शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत. औरंगाबाद : शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत.  औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील उद्योग सर्किटमध्ये ३० ते ४० हजार कोटींची वार्षिक उलाढाल होेते. यातील ४० टक्के उलाढाल ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून होते. म्हणजेच १६ हजार कोटींची उलाढाल यातून होते. यातील ५० टक्के म्हणजेच ८ हजार कोटींची उलाढाल ही वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगांतून होते. ५० कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी गतवर्षी ३० टक्के कॉर्पाेरेट कर सवलत होती, ती सवलत या